Monday, 4 February 2019

नगर रायझिंग हाफ मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात



नगर । प्रतिनिधी -  ‘हम फिट तो नगर फिट’ असा नारा देत सुमारे साडेतीन हजार नगरकरांनी रविवारी सकाळी नगर रायझिंग हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. सकाळी 6 ते 9 यावेळेत अवघे नगर आरोग्याचा संदेश देत धावत असल्याचे मनोहारी दृष्य पहायला मिळाले. गुलाबी थंडीत उत्साहाची उब घेवून व सोनेरी सूर्यकिरणांना साक्षी ठेवून प्रत्येकाने आपापल्या गटातील मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. अतिशय शिस्तबध्दरित्या आणि तितक्याच उत्साहात संपूर्ण मॅरेथॉन पार पडली. पोलिस दल, स्वयंसेवकांची फळी आणि नगरकरांचा प्रतिसाद यामुळे संपूर्ण स्पर्धेतून शिस्तीचे दर्शन घडले. 21 कि.मी., 10 कि.मी. तसेच 3 व 5 कि.मी.या चार गटात ही स्पर्धा झाली. प्रत्येकाने नगर रायझिंगच्या टिमचे आभार मानत एका चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, आ.संग्राम जगताप,  अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रणित नायर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनुराग जैन, आयर्नमन किताब विजेत्या अंजली भलिंगे, शौनक खर्डे, नितीन घोरपडे, प्रसाद पाटील, महेश मुळे, अंध धावपटू अमरजित सिंग, नगर रायझिंग फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया,  स्पर्धा संयोजक संदीप जोशी, डॉ. सतीष सोनवणे, डॉ.शाम तारडे, अ‍ॅड.गौरव मिरीकर आदी उपस्थित होते. 
या स्पर्धेसाठी डॉ.निलम पंडित,  डॉ. महादेव रंधाळे, विद्या दाभाडे, संदीप कुसळकर , अतुल डागा, योगेश चुत्तर, गौरव  बोथरा, गौतम जायभाय, जगदीप मकर,  जितेश माखिजा, मेहेरप्रकाश तिवारी, सुमेर सिंग, योगेश खरपुडे, अक्षय मुनोत, गौरव फिरोदिया आदींनी महत्वपूर्ण योगदान दिले. 
स्पर्धेसाठी नगर रायझिंग फाऊंडेशनसह आय लव्ह नगर,  अहमदनगर पोलिस,  अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड, फोर्स मोटर्स, एस.एस.कम्युनिकेशन, सिटी पंडोल,  सुहाना मसाला, जयराज, बी.यू.भंडारी,  आयआयएफएल, फोटोग्राफी पीक टु.गो, टायमिंग टाऊन स्क्रीप्ट, एसपीजी रनर्स,  युवान,  टेन.टि.शर्ट,  परिवार मिल्क,  अहमदनगर क्लब,  अहमदनगर नेत्रतज्ज्ञ संघटना,  भूलतज्ज्ञ संघटना, ऑर्थोपेडीक संघटना, जिल्हा हौशी अ‍ॅथलीट संघटना आदी संस्था, संघटनांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment