नगर । प्रतिनिधी - दासनवमी उत्सवानिमित्त श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ आयोजित श्री समर्थ विद्या मंदिर, सावेडी प्रशालेत पालखीसह प्रभात फेरी काढण्यात आली.
मुलींच्या लेझीम पथकाने रंगतदार लेझीमचे डाव खेळून मने जिंकून घेतली. समर्थांच्या पालखीचे पूजन चौकाचौकांतून करण्यात आले. मनाचे श्लोक, जय जय रघुवीर समर्थ या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. प्रशालेत पालखीचे पूजन होऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
प्रभात फेरीमध्ये संस्थेचे व्हा. चेअरमन डी. आर. कुलकर्णी, खजिनदार सतीशचंद्र कुलकर्णी, शालेय समितीचे चेअरमन सुरेश क्षीरसागर, माजी प्राचार्या संध्या कुलकर्णी, माध्यमिकच्या प्राचार्या संगीता जोशी, प्राथमिकचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार आदींसह विद्यार्थी, पालक सहभागी झाले होते.
No comments:
Post a Comment