Wednesday, 13 February 2019

एमआयडीसी पोलिस ठाण्यातर्फे स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध


नगर । प्रतिनिधी - नागरिकांची नेहमीच वर्दळ असलेल्या एमआयडीसी पोलिस ठाणे परिसरात स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, त्याचे उद्घाटन पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 12) सायंकाळी फीत कापून करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, नगर शहर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक (गृह) अरुण जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, कोतवालीचे पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, भिंगारचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, नगर तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत 36 गावे व वाड्यावस्त्यांचा समावेश होतो. पोलिस ठाण्यास दररोज सुमारे दोनशे महिला-पुरुष कामानिमित्त भेट देतात. त्यांच्या सोयीकरिता एक्साईड बॅटरी कंपनीचे व्यवस्थापक सुभ्रा सिन्हा, श्री. डबीर यांच्या सहकार्याने स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात येणार्‍या नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. यावेळी एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक सिद्धेश्वर गोरे व सुनील सूर्यवंशी, नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे, पोलिस नाईक पांढारकर, महेश दाताळ, परशुराम नाकाडे, बंडू नाना सप्रे, डॉ. गडगे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment