नगर । प्रतिनिधी - देशात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आहे. सर्व सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात रमले आहेत. अशात देशाचे संरक्षणकर्त्या सैनिकांवर पाकिस्तानने भ्याड हल्ला करुन देशाच्या पाठित खंबीर खुपसला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुका नंतर घ्या, आधी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्या. वारंवार देशावर असे हल्ले होत आहेत. हे थांबविण्यासाठी पाकिस्तानशी समोरासमोर युद्ध करुन बदला घ्या. त्यानंतर भारतात शांतता नांदेल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सक्षमपणे निर्णय घ्यावा, असे आवाहन सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी केले.
नगर शहरातील सराफ सुवर्णकार संघटनेच्यावतीने पुलवामा येथील सैनिकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सराफ बाजारात चौक सभा घेण्यात आली. यावेळी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा, राज्य उपाध्यक्ष सुभाष मुथा, ज्येष्ठ व्यवसायिक सुभाष कायगांवकर, निळकंठ देशमुख यांच्यासह सराफ व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सुभाष मुथा म्हणाले, जिल्ह्यातील व राज्यातील सर्व सराफ व्यवसायिक या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहेत. हा सैनिकांवर झालेला हल्ला नसून, प्रत्येक नागरिकावर हल्ला झाला आहे. ईट का जबाब पत्थर से देण्याची वेळ आली आहे. या हल्ल्यात शहिद झालेल्या आपल्या सैनिकांच्या कुटूंबियांच्या दु:खात आम्ही सर्व सराफ व्यवसायिक सहभागी असून, त्यांना धीर देण्यासाठी त्यांच्यामागे खंबरपणे उभे राहू.
यावेळी प्रमोद बुर्हाडे, शांताराम देवळालीकर, मुकुंद रत्नापुरकर, संतोष देडगांवकर, बंट्टी देवळालीकर, गोल्ड क्लस्टरचे प्रमुख प्रकाश लोळगे, प्रकाश डहाळे, राजेश मिरांडे, मयूर कुलथे, श्याम मुंडलिक, जिमी विराणी, संतोष मुथा, योगेश नागरे, सचिन कायगांवकर, विनोद लिंबिकर, ओम आग्रवाल, रसिक कटारिया, अरुण डावरे, शिवाजी पाटील, शिवा मडगांवकर, जितू पोरवाल यांच्यासह सराफ व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment