नगर । प्रतिनिधी - नगर तालुक्यातील नारायणडोह ते सोलापूरवाडी (ता. आष्टी) यादरम्यान हायस्पीड इंजिनची सात डबे जोडून सोमवारी चाचणी घेण्यात आली.
यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त (मध्य रेल्वे) ए.के. जैन, मुख्य प्रशासकीय अधिकारी निर्माण (मध्य रेल्वे) एस.के. तिवारी, मुख्य अभियंता निर्माण (मध्य रेल्वे) दिनेश कटारिया, मंडल रेल्वे प्रबंधक (सोलापूर) हितेंद्र मल्होत्रा, रेल्वेचे उपमुख्य अभियंता (नगर) चंद्रभूषण, कार्यकारी अभियंता व्ही.पी. पैठणकर, वरिष्ठ अनुभाग अभियंता विद्याधर धांडोरे, एस.आर. कुंवर, श्रीराम कंट्रक्शनचे संचालक सुरेश पेनसीलवार, आनंद पेनसीलवार, दिलीप पेनसीलवार आदी उपस्थित होते.
अहमदनगर - नारायणडोह - सोलापूरवाडी या रेल्वेमार्गावर ताशी 120 किमी या वेगाने रेल्वे धावली. ही चाचणी यशस्वी झाली असून, अहमदनगर ते सोलापूरवाडी रेल्वे आता धावू शकणार असल्याचे रेल्वे विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
No comments:
Post a Comment