नगर । प्रतिनिधी - माहिती हे खरे ज्ञान नसून, सर्जनशील निर्मिती हे खरे ज्ञान आहे. विद्यार्थ्यांना खर्या ज्ञानाची लालसा असावी. पाठांतर करून पास व यशस्वी होणे हा एक भास आहे. मातृभाषेतून शिक्षण व शिक्षकांनी मनापासून केलेल्या अध्यापनाने गुणवत्तापूर्ण विद्यार्थी निर्माण होतात. खरी गुणवत्ता ग्रामीण भागातूनच निर्माण होत असल्याची भावना एल अॅण्ड टी कंपनीचे महाव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी व्यक्त केली. तर कंपनीच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात देण्यात येणारे योगदान स्पष्ट केले.
जेऊर (ता.नगर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयालात एल अॅण्ड टी कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरचे उद्घाटन प्रसंगी पारगावकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी संजय नागपुरे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य बापूसाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविकात शाळेत राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती दिली. संजय नागपुरे यांनी उभारण्यात आलेल्या मिनी सायन्स सेंटरच्या माध्यमातून सर्जनशील कृतिशील व चिकित्सक वृत्ती असणारे विद्यार्थी घडणार आहेत. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन, जीवनात यशस्वी होण्याचे त्यांनी सांगितले. तर विद्यालयाला कर्मवीर पारितोषिक तसेच उपक्रमशील शाळा पारितोषिक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. दत्तात्रय मगर यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, इन्स्पायर अवॉर्ड विजेते विद्यार्थी, शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य नारायण तोडमल, अॅड.दिलीप बनकर, दत्तात्रय मगर, सरपंच मधुकरराव मगर, विलासराव तोडमल, गोविंदराव शेटे, हरिभाऊ शेटे, उद्योजक सतीश थोरवे, ईश्वर हंडे, संतोष निकम, बाळासाहेब चव्हाण, आर.एस.बनकर, बाळासाहेब साळुंके, अजय मगर, अजय मगर, उपमुख्याध्यापिका उषा पारधे, पर्यवेक्षक भानुदास धुमाळ आदिंसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता साळवी व सौ.सुरेखा वाघ यांनी केले. भानुदास धुमाळ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment