Monday, 25 February 2019

अण्णा हजारे यांना राष्ट्रहितवादी लोकनायक उपाधीने मानवंदना


नगर । प्रतिनिधी - मेरे देश मेरा अपना घर आंदोलन, पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदच्या वतीने उन्नत चेतनेने राष्ट्रहितासाठी स्वत:चे आयुष्य वेचणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाणता, कृतीशील, राष्ट्रहितवादी लोकनायक या उपाधीने हुतात्मा स्मारकात मानवंदना देण्यात आली. 
सर्वसामान्यांच्या व देशाच्या हितासाठी लढा देऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी खेड्यांचा विकास, माहितीचा अधिकार कायदा, लोकपाल कायदा तसेच दप्तर दिरंगाई विरोधी कायदा करावयास सरकारला भाग पाडले. भ्रष्टाचार्‍यांविरोधात देशव्यापी लढा अण्णांनी सुरु ठेवला आहे. त्यांनी स्वत:चा संसार न करता देश हाच आपला कुटुंब मानून देशाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना लोकनायक या उपाधीने मानवंदना देण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.  
भ्रष्ट मार्गाने अनेक लोकप्रतिनिधींनी सत्ता मिळवली. परंतु उन्नत चेतनेच्या अभावाने सर्वसामान्यांचे कल्याण  झाले नाही. उन्नत चेतनेचा अभाव असल्याने घरकुल वंचितांना देखील अद्यापि न्याय मिळालेला नाही. लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून सरकारला जागा व मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी न देता घरकुल वंचितांची प्रकल्प उभारणे सहज शक्य होणार आहे. मात्र तमस चेतनेच्या वृत्तीने राजकीय मंडळी राजकारणात गुंतले आहेत. यामुळे घरकुल वंचितांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याची खंत अशोक सब्बन यांनी व्यक्त केली.
उन्नत चेतनेचा अभाव असल्याने सरकारी अधिकारी भ्रष्टाचारात अडकले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने अण्णा हजारे यांचे कार्य चालू आहे. अण्णा आजच्या पिढी समोर आदर्श असून, त्यांच्या प्रेरणेने भ्रष्टाचारमुक्त भारताची मुहुर्तमेढ रोवली जाणार असल्याची भावना अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment