नगर । प्रतिनिधी- श्री संत सेवालाल महाराज जयंतीनिमित्त तारकपूर येथे धर्मनाईक तांडा येथे सेवालाल महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नागरिक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातून मोठ्या रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु काल जम्मू-काश्मीरमध्ये सैनिकांवर भ्याड हल्ल्याची घटना घडली. त्याच्या निषेधार्थ शहरातून काढण्यात येणारी मिरवणूक रद्द करण्यात आली. तसेच यावेळी शहीद जवानांना श्रध्दांजली अर्जण करण्यात येऊन तारकपूर भागातून ही मिरवणूक काढण्यात आली.
No comments:
Post a Comment