Monday, 4 February 2019

खा.दिलीप गांधी ‘श्रेष्ठ कर्मयोग संसदपटू’


नगर । प्रतिनिधी - ज्यांनी लोकसभा सभागृहाबरोबरच आपल्या मतदार संघात उत्कृष्ट काम करुन विकास केला.  अशा खासदारांना आज सन्मानित करण्यात आले आहे. या उत्कृष्ट खासदारांमध्ये माझाही समावेश असता तर मोठा आनंद झाला असता. खासदार म्हणून जेवढे संसदेत काम करावे लागते, त्यापेक्षा अधिक संसदेबाहेर काम करावे लागते. खासदाराने काय काम केले, याचा लेखा-जोखा केला जातो. तेव्हा लोकसभा व राज्यसभेतील कामाचा विचार करण्याबरोबरच संपूर्ण मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा, त्यांच्या योगदानाचा विचार व्हावा. ‘फेम इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या संस्थेने उत्कृष्ट सर्व्हे करुन हेच काम केले आहे. याबद्दल त्यांचे आभार व अभिनंदन. उत्कृष्ट संसदपटूचा सन्मान मिळालेले खासदार पुन्हा निवडून यावेत व पुन्हा भाजपाची सत्ता यावी, अशा सदिच्छा केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी दिल्या.
 ‘फेम इंडिया’ या राष्ट्रीय स्तरावर काम करणार्‍या संस्थेने संपूर्ण भारतात लोकसभा टेलिव्हिजनचे मुख्याधिकारी राजीव मिश्रा यांच्या अध्यक्षते खालील विविध क्षेत्रातिल तज्ज्ञांच्या समितिने सर्व्हे करुन देशातील 25 सर्वोत्कृष्ट खासदारांची  ‘सर्वश्रेष्ठ खासदार 2019’ या पुरस्कारासाठी निवड केली. यात नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांना ‘कर्मयोगी खासदार’ पुरस्कार देण्यात आला. दिल्ली येथील विज्ञान भवनात केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा व केंद्रीय उद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते हा सर्वोत्कृष्ट खासदार पुरस्कार दिलीप गांधी यांना देऊन सन्मानित करण्यात आले. 
विज्ञान भवनात झालेल्या या शानदार पुरस्कार वितरण सोहळ्यास फेम इंडियाचे प्रबंध निदेशक श्रीमती राज मुख्य अधिकारी उमाशंकर सोंथालिया, एशिया पोस्टचे परिक्षक व वरिष्ठ पत्रकार राजीव मिश्रा, खा.साबीर शेख, फेम इंडियाचे कार्य.निदेशक यु.एस.सोंथालिया, कात्यायनी टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित श्रीवास्तव, राधवादेश अस्थानी, दिपाली श्रीवास्तव आदिंसह  नगर जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित होते. 
खा. गांधींनी वेळोवेळी लोकसभेत मांडलेले महत्वाचे व अभ्यासपूर्ण प्रश्न, मतदारसंघात विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावानीतून केलेल्या विकास कामांची दखल निवड समितीने घेऊन हा मानाचा पुरस्कार दिला.
  प्रास्तविकात फेम इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमाशंकर सेंथालिया म्हणाले, भारतीय लोकतंत्रमध्ये खासदारांची अहम भुमिका आहे. सर्वसामान्य जनतेला कळले व सांगितले पाहिजे की, त्यांनी निवडून दिलेला खासदार कसे काम करत आहेत. यासाठीच आम्ही फेम इंडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध सर्व्हे एजन्सी एशिया पोस्ट बरोबर सर्व्हे करुन  देशातील 25 कर्मयोद्धा लोकसभा सदस्यांना ‘श्रेष्ठ संसद अ‍ॅवॉर्ड 2019’ देऊन सन्मानित केले आहे.

No comments:

Post a Comment