नगर । प्रतिनिधी - अहमदनगर एज्युकेशन सोसायटी व रोटरी प्रियदर्शनी क्लब, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अ. ए. सो. चे अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थिनी व शिक्षिकांसाठी स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅड वेंडींग व डिस्पोजल युनिटचे उद्घाटन करण्यात आले.
कमला हॉस्पिटल व प्लस फाऊंडेशनच्या डॉ. अंशु मुळे यांच्याहस्ते या मशीनचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, आशा फिरोदिया, रोटरी प्रियदर्शनी क्लबच्या अध्यक्षा रिटा झंवर, रोटेरीयन प्रतिभा धूत, शीला माकर यांच्यासह शाळेतील शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
यावेळी डॉ. मुळे यांनी किशोर ते कुमारवयीन टप्प्यातील मुलींचे होणारे शारीरिक, मानसिक बदल याबद्दल सविस्तर माहिती दिली. शाळेतील स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन व डिस्पोजल युनिटचे असणारे महत्व पटवून दिले.
सूत्रसंचालन अर्चना मुंडीवाले यांनी केले. ट्विंकल बनसोडे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment