Wednesday, 27 February 2019

सिद्धीबागेच्या साफसफाईसह मत्स्यालयाची तातडीने दुरुस्ती करावी ः महापौर


नगर । प्रतिनिधी - नगर शहरातील नागरिकांसाठी सोयीचे असलेले एकमेव उद्यान असलेल्या सिद्धीबागेच्या झालेल्या दुरवस्थेची महापौर बाबासाहेब वाकळे यांनी गांभीर्याने दखल घेत मंगळवारी (दि.26) दुपारी बागेची पाहणी करीत तातडीने साफसफाई व आवश्यक दुरुस्तीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. 
शहरातील सिद्धीबागेची सध्या अतिशय दुर्दशा झाली आहे. नगर शहरातील लहान मुलांच्या खेळण्यासाठी एकमेव असणारी सिद्धीबाग ही आता उध्वस्त होण्याच्या मार्गावर येवून ठेपली आहे. या पूर्वी या बागेत दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असायची, शहरातील नागरिक आपल्या लहान मुलांना दररोज सायंकाळी खेळण्यासाठी घेऊन येत होते. आजची परस्थिती या बागेत असणारी विविध प्रकारची खेळण्या या लहान मुलांच्या खेळण्यास योग्य नाही. 
तसेच जो आकर्षक आणि भव्य मासा आहे तोही बंद पडलेला असल्याने या बागेत मुलांसाठी खेळण्याचे वातावरणच उरलेले नाही.एकेकाळी सकाळी व सायंकाळी बच्चेकंपनी व नागरिकांच्या गर्दीने फुलणार्‍या सिद्धीबागेची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहे. त्याची दखल घेत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मंगळवारी (दि.26) दुपारी बागेची पाहणी  केली. यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त प्रदीप पठारे, सुवेंद्र गांधी, नगर सचिव एस.बी.तडवी, धनंजय जाधव, अजय चितळे, सागर गोरे, उद्यान विभागाचे किसन गोयल, उद्धव म्हसे आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर वाकळे यांनी सर्व परिसराची पाहणी केली. तसेच दुरवस्था झालेले मस्त्यालय तातडीने दुरुस्त करून घ्यावे, उद्यान विभागाचे जास्त कर्मचारी बुधवारी (दि.27) सिद्धीबागेत बोलावून घेत त्यांच्याकडून संपूर्ण बागेची साफसफाई करून घ्यावी. तसेच या पुढे सातत्याने दैनंदिन स्वच्छता करण्यात यावी. बागेतील खेळण्या, विद्युत दिवे यांच्या दुरुस्ती साठीचे प्रस्ताव तातडीने तयार करून ते मंजुरीसाठी सादर करावेत असे आदेश दिले.

No comments:

Post a Comment