नगर । प्रतिनिधी - सावेडी उपनगरातील शिलाविहार येथील ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिरात जन्मोत्सव सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. रविवारी सकाळी 7 वा. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या मूर्ती व पादूकांवर फुलांचा वर्षाव करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्रीराम जय राम जय जय राम या नामजपाने मंदिर दुमदुमले. सकाळी श्रींच्या पादुकांची मिरवणूक वसंत टेकडी, श्रीराम चौक, पाईपलाईन रोडवरुन काढण्यात आली. चौका-चौकात पालखीचे पूजन करण्यात आले.
शिलाविहार येथे नगरसेविका रुपालीताई वारे यांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. श्रीराम चौकात नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या हस्ते पूजा झाली. 11 ते 1 यावेळेत रामकृष्ण हरि शिक्षण संस्था, पिंपळदरी येथील हभप बाळाराम रंधे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला. याचा लाभ असंख्य भाविकांनी घेतला. सप्ताहात सहकार्य करणार्या सर्वांचेच सुंदरदास रिंगणे देवा, रेखाताई रिंगणे यांनी आभार मानले. सेवाभावी मंडळाच्या सर्व सदस्यांनी 7 दिवस परिश्रम घेऊन सप्ताह यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल धनंजय महाराज क्षीरसागर यांनी सर्वांचे कौतुक केले.
No comments:
Post a Comment