नगर । प्रतिनिधी - टीम टॉपर्स अकॅडमीची खेळाडू जागृती बागल हिने महाराष्ट्र स्केटिंग असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या दुसर्या मिनी राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत यश संपादन केले. तिने स्केटिंगच्या कॉडलाईन प्रकारात 200 मीटरमध्ये रौप्य तर 400 मीटर मध्ये कांस्यपदक पटकविले.
ही स्पर्धा विराट पालघर येथील आंतरराष्ट्रीय स्केटिंग ट्रॅकवर पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातून सुमारे 800 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. जागृती बागल ही माऊंट लिटेरा किडझी स्कूलमध्ये शिकत असून, ती नगरमधील टीम टॉपर्स स्केटिंग अकॅडमीमध्ये सराव करते. तिला अकॅडमीचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत पाटोळे व सचिव सागर भिंगारदिवे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य सचिन कानडे, अकॅडमीचे उपाध्यक्ष सागर कुक्कडवाल व जिल्हा स्केटिंग संघटनेचे सचिव आसिफ बाबूलाल शेख यांनी तिचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment