Wednesday, 20 February 2019

युवकांनी शिवचरित्र अभ्यासण्याची गरज


नगर । प्रतिनिधी - छत्रपती  शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील, तर युवकांनी त्यांचे चरित्र अभ्यासण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक संपत शिंदे यांनी केले. 
सावेडी येथील शिवरत्न जिवबा महाले चौकात शिवजयंतीनिमित्त मंगळवारी छत्रपती शिवाजी राजेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जिवा सेना संघटनेच्यावतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तरुणांना मार्गदर्शन करतांना शिंदे बोलत होते. यावेळी जिवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक औटी, नगरसेवक सुनील त्र्यंबके, योगेश पिंपळे, नीलेश पवळे, कॉ.बहिरनाथ वाकळे, यादव आव्हाड, संजय वाघ, राजूभाई शेख, सुभाष लांडे, संध्या मेढे आदी उपस्थित होते. यावेळी पुलवामा येथील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
शिंदे पुढे म्हणाले, शिवचरित्रामधून आजच्या युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. ते कुठल्या समाजाचे, जातीचे, धर्माचे नाहीत तर बहुजनांचे राजे आहेत. युवकांनी जाती-पातीच्या चौकटीत त्यांना बंद करु नये. त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणून दाखवण्याची गरज आहे. 
अशोक औटी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. संपूर्ण जगाला आदर्श राजा म्हणून हेवा वाटावा, असे विलक्षण व्यक्तिमत्व होते. शिवरायांच्या जीवनातील घटना या आदर्शवत, थरारक, अंगावर काटा आणणार्‍या आहेत. असा हा रयतेचा राजा सर्वांच्या हृदयात आहे, असे सांगितले.
कार्यक्रमास नंदू खाकाळ, आबाजी सैंदाणे, राजाभाऊ पालवे, डॉ.अशोक गायकवाड, नंदू वाघमारे, अमोल चेमटे, दत्ता वडवणीकर, रघुनाथ औटी, संतोष यादव, आशिष सावंत आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment