Thursday, 21 February 2019

लालटाकी येथे रसाळ नेत्रालयाचा सोमवारी शुभारंभ


नगर । प्रतिनिधी - नेत्ररूग्णांना आधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देत सर्वोत्तम रूग्णसेवा देण्याचे ध्येय ठेवून नगरमध्ये लालटाकी येथील कालिका प्राईड बिल्डिंगमध्ये नवीन सुसज्ज असे रसाळ नेत्रालय सुरू होत आहे. ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) सायंकाळी 5 वाजता या नेत्रालयाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती डॉ. प्रकाश रसाळ व सौ. अमृता रसाळ यांनी दिली. या दिवशी दुपारी 2 वाजेपासून रूग्णालयाला सदिच्छा भेट देता येणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खा. दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, आ. अरूण जगताप, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. सुरेश धस, आ. भीमराव धोंडे, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी आ. साहेबराव दरेकर, माजी आ. अनिल राठोड, साहेबराव थोरवे, अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, डॉ. लक्ष्मीकांत किनगांवकर, डॉ. सुजय विखे, अ‍ॅड. बाळ बोठे, डॉ. सुंदर गोरे, प्राचार्य डॉ. ज्ञानदेव म्हस्के, डॉ. अशोक देशपांडे, डॉ. अभिजीत पाठक, डॉ. रमेश मूर्ती, हेमंतकुमार पोखरणा आदी उपस्थित राहणार आहेत.
नेत्रोपचाराचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या डॉ. रसाळ यांनी लातूर येथे एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेतल्यानंतर जालना येथे पदव्युत्तर पदवी (डी.ओ.एम.एस.) मिळवली. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी 2009 ते 2011 दरम्यान बीड जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. पुढे त्यांनी मिरज येथील नामांकित लायन्स नॅब आय हॉस्पिटल येथे दोन वर्षे फेलोशीप केली. ते नगरमध्ये 2013 पासून प्रॅक्टिस करीत असून आता रसाळ नेत्रालयाच्या माध्यमातून अधिकाधिक नेत्ररूग्णांना दर्जेदार उपचार सुविधा देण्यासाठी त्यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. मोतीबिंदू, काचबिंदू, नेत्ररोपण व कॉर्निया शस्त्रक्रिया, लासूर, पापणी, तिरळेपणा शस्त्रक्रियांमध्ये त्यांचा हातखंडा असून अनेक रूग्णांना याचा लाभ झालेला आहे. बेंंगलोर येथील महावीर आय इन्स्टिट्यूट, हैदराबाद येथील एल. व्ही. प्रसाद आय इन्स्टिट्यूट, मदुराई येथील अरविंद आय केअर, पनवेल येथील लक्ष्मी आय इन्स्टिट्यूट अशा अनेक प्रतिष्ठीत संस्थांमध्ये त्यांनी नेत्रोपचारासंबंधीत अत्याधुनिक प्रशिक्षण घेतले आहे.
नगरमधील रसाळ नेत्रालय सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 3 व सायंकाळी 6 ते रात्री 8 यावेळेत नेत्ररूग्णांसाठी खुले असणार आहे. डॉ. रसाळ यांचे आष्टी तालुक्यातील कडा येथेही सुसज्ज नेत्रालय कार्यरत असून याठिकाणी दर रविवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत ते रूग्णसेवा करतात. नगरमधील रसाळ नेत्रालयाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीमती मंगल बळवंत रसाळ, सौ. व श्री. प्रा. मंगेश रसाळ, सौ. व डॉ. योगेश रसाळ यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment