Thursday, 14 February 2019

आचार्य सुदर्शनलालजी म.सा.यांचे शुक्रवारी आनंदधाम येथे आगमन


नगर । प्रतिनिधी - युवामनिषी आचार्य सुदर्शनलालजी म.सा.आदी ठाणा 6 यांचे शुक्रवार दि.15 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता महावीरनगर जैन स्थानकातून आनंदधामच्या पवित्र प्रांगणात  आगमन होणार आहे. आनंदधाम येथे दि.15 ते 17 फेब्रुवारी दरम्यान रोज सकाळी 9 ते 10 यावेळेत त्यांचे विशेष प्रवचन होणार आहे, अशी माहिती जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल मुनोत व सेक्रेटरी संतोष बोथरा यांनी दिली. 
आचार्य पू.सुदर्शनलालजी म.सा. यांनी वयाच्या 15 व्या वर्षी जैन धर्माची दीक्षा घेतली. पू.पन्नालालजी म.सा. यांचे शिष्य पू.सोहनलालजी म.सा. यांचे पू.सुदर्शनलालजी म.सा. हे पट्टशिष्य आहेत. राजस्थान ते दक्षिण भारत असा विहार करून ते नगरला आले आहेत. त्यांच्या सान्निध्याचा व दिव्य मार्गदर्शक प्रवचनाचा लाभ आनंदधाममध्ये  नगरकर श्रावक, श्राविकांना मिळणार आहे.

No comments:

Post a Comment