नगर । प्रतिनिधी - नगर-दौंड रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू असून शहराजवळील कायनेटिक चौक ते अरणगावपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण तसेच रस्ता दुभाजक, वृक्षारोपण ही सर्व कामे मार्च अखेरीस पूर्ण होतील. तशा सूचना ठेकेदार कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
हे काम सुरू असताना काही शेतकर्यांनी या कामास विरोध केला होता. त्याची दखल घेत खा. गांधी यांनी शनिवारी (दि. 23) दुपारी या रस्त्याच्या कामाची पाहणी करत शेतकर्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेत हा प्रश्न सोडविण्याच्या सूचना ठेकेदार कंपनी व बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
यावेळी त्यांच्यासोबत किशोर बोरा, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, मिलिंद भालसिंग, दादासाहेब बोठे, मोहन गहिले, ज्ञानदेव शेळके, दिलीप कांबळे, भाऊसाहेब मोरे, महेश पवार, पोपट शिंदे, बबन शिंदे, सुभाष पुंड, सागर कल्हापुरे, रंगनाथ शिंदे, संपत कांबळे, किसनराव लोटके, बाबासाहेब कल्हापुरे, गौतम जाधव, बबन करांडे, अभियंता संजयकुमार जैस्वाल आदी उपस्थित होते.
खा. गांधी पुढे म्हणाले, शेतकर्यांच्या व अरणगाव परिसरातील नागरिकांच्या सर्व अडचणी सोडविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या कामाला आता वेग येणार असून मार्च अखेरीस अरणगावपर्यंत चौपदरी रस्ता पूर्ण होईल. यामध्ये दुभाजक असतील, त्यात तसेच दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले जाईल. अरणगाव येथे सुसज्ज बसथांबा करण्यात येईल. बाह्यवळण रस्ता चौक आणि बीड रेल्वे मार्ग याठिकाणी उड्डाणपूल केले जाणार आहेत. याशिवाय अरणगाव परिसरात या रस्त्याच्या कडेने सर्व्हिस रोड केले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल.0
बीड रेल्वे मार्गाचे काम सुरु असून लवकरच नगर ते शिरढोणपर्यंत रेल्वेची चाचणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment