Saturday, 23 February 2019

बुर्‍हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन फुटली


नगर । प्रतिनिधी - नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन आज (शनिवार) पहाटे फुटली आहे. यामुळे या पाईपलाईनवरुन पाणी भरणार्‍या टँकरच्या रांगा लागल्या आहेत.
या पाईपलाईन योजनेवरुन नगर तालुक्यातील 14 गावांसाठी सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर-औरंगाबाद रस्त्यावरील इंद्रायणी पॉईंटवरुन हे टँकर भरले जातात. दिवसभरात नगर तालुक्यातील देवगाव, सारोळबद्दी, आगडगाव, रतडगाव, जेऊर, कौडगाव, मदडगाव, धनगरवाडी, ससेवाडी आदी गावांना टँकरच्या दोन फेर्‍या होतात. आज पहाटे मुळा डॅम फाट्याजवळील बाभुळगाव-वरवंडीजवळ बुर्‍हाणनगर पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन फुटली. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
सध्या नगर तालुक्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या गावांमधील नागरिकांना टँकरच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने या गावांतील लोकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत.
दरम्यान या फुटलेल्या पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment