Monday, 18 February 2019

चर्मकार समाजातील 22 महिलांना संत रविदास महिला समाजभूषण पुरस्कार प्रदान


नगर । प्रतिनिधी - महिलांना कुठल्याही क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली तर त्या संधीचे सोने केल्याशिवाय त्या राहत नाहीत. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे यांनी केले. 
चर्मकार विकास संघ व लोकनेते माजी आ. सीताराम मामा घनदाट सामाजिक प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने कोहिनुर मंगल कार्यालय येथे आयोजित संत रविदास महिला समाज भूषण पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी त्या बोलत होत्या.
आ. अरुणकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, सचिव सुभाष चिंधे, कॉ. स्मिता पानसरे, मुंबई महानगर पालिकेच्या नगरसेविका आशाताई मराठे, सोनईच्या नगरसेविका सुरेखा साळवे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, सुनिल त्र्यंबके, सुभाष मराठे, अभिनेत्री विनिता सोनावणे, निर्माता दिग्दर्शक शरद गोरे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपास्थित होते.
यावेळी बोलतांना शालिनी विखे पुढे म्हणाल्या की, समाजातील महिला चूल आणि मूल सांभाळून पडद्यामागे राहून कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याबरोबरच सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करतात. सुशिक्षित व सुसंस्कारीत पिढी घडवणार्‍या महिलांमध्ये प्रत्येक संकटांचा सामना करण्याची नैसर्गिक शक्ती असते. हि बाब या पुरस्कार वितरण सोहळ्यामुळे ठळकपणे समाजापुढे आली आहे. 
कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या की, चर्मकार समाजातील आदर्श मातांना संत रविदास महिला समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा कार्यक्रम हा चर्मकार विकास संघाचे वेगळेपण सिद्ध करणारा कार्यक्रम आहे. ज्या व्यक्ती समाजातून शिकून शहाण्या होऊन पुढे गेल्या त्यांनी आपल्या समाजातील मागे राहिलेल्या समाजबांधवांना पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. 
आ.अरुण जगताप म्हणाले की, नगर जिल्ह्यात व शहरात चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून समाज विकासाचे चांगले काम होत आहे. या कामाला पाठिंबा देण्यासाठी संत रविदास महाराज विकास केंद्रासाठी नगर शहरामध्ये भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याच बरोबर येथे बांधकाम व संरक्षक भिंत उभी करण्यासाठीही मी आर्थिक मदत करणार आहे. 
यावेळी नगरसेवक सागर बोरुडे,  सुनिल त्र्यंबके, अभिनेत्री विनिता सोनावणे, निर्माता दिग्दर्शक शरद गोरे यांचीही भाषणे झाली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी सदिच्छा भेट देऊन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
आयुष्याची 50 वर्षे आपल्या चार मतिमंद मुलींची सेवा करण्यासाठी व्यतीत केलेल्या शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथील सौ. इंदूबाई एकनाथ नन्नवरे यांना संत रविदास जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर चर्मकार समाजातील सिताबाई दुर्गे, उर्मिला तेलोरे, कृष्णाबाई देशमुख (अहमदनगर), सौ. सुमन धस (श्रीरामपूर), श्रीमती रंजना उदमले (कर्जत), सौ. नर्मदा पोटे (पारनेर), श्रीमती सकूबाई साळवे (श्रीगोंदा), श्रीमती जनाबाई उदमले (पाथर्डी) , श्रीमती लक्ष्मीबाई कानडे (नेवासा), सौ.चंद्रभागा तुपे (श्रीरामपूर), संजया उदमले (शिर्डी), श्रीमती लक्ष्मीबाई सोनावणे (राहता), सौ. रंजना वाघमारे (शेवगाव), सौ. लतिका सातपुते (जामखेड), सौ. रंजना बारसे (कोपरगाव), सौ. संगीता वाघचौरे, सौ. रुख्मिणीबाई अभंग (संगमनेर), सौ. सिंधुबाई ठोकळे (राहुरी), श्रीमती कलावती घोलप (अकोले), सुमनबाई कांबळे (वांबोरी), आदी महिलांना संत रविदास महिला समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रारंभी पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महापुरुषांना अभिवादन व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. शेवंगाव येथील चित्रकार शीतल गोरे यांनी साकारलेल्या संत रविदास महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चर्मकार विकास संघाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मानचिन्ह,  शाल व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांनी आपल्या प्रास्तविकपर भाषणातून संघटनेच्या 5 वर्षाच्या कामाचा आढाव घेऊन भविष्यकालीन योजनांची माहिती दिली. अमोल बागुल यांनी सूत्रसंचालन केले. रामराव ज्योतिक यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्जेराव गायकवाड, रामराव ज्योतिक, अरुण आहेर, मधुकर घनदाट,  संभाजी साळे,  अरुण गाडेकर, श्रीपती ठोसर, रुख्मिणीताई नन्नवरे,  रामदास सातपुते, नानासाहेब शिंदे,  देवराम तुपे,  संतोष कानडे, अशोक शेवाळे, मच्छीन्द्र भोसले, अर्जुन कांबळे,  दादाभाऊ ढवळे, संजय गुजर, निलेश आंबेडकर,  बलराज गायकवाड,  मनिष कांबळे,  गणेश नन्नवरे,  विजय साळी, अशोक आंबेडकर,  किरण सोनवणे, सुरेखा कानडे, संतोष कांबळे, दिलीप कांबळे, पांडुरंग काजळकर, अर्जुन दुर्गे, संतोष कदम, विकी कबाडे, गणेश लव्हाळे आदींनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment