नगर । प्रतिनिधी - लिंक रोड, राधेश्याम चौक कामातील धोकादायक स्थितीत असलेल्या डी.पी.ला ताण देऊन सुव्यवस्थित न केल्यास वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा केडगाव येथील बाळासाहेब सातपुते यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
कल्याण-पुणे महामार्गाला जोडणार्या लिंक रोडवरील राधेश्याम कॉम्प्लेक्स चौकात वीज कंपनीची 132 फिडरची मेनलाईन गेली असून, त्याची डीपी या चौकात रस्त्याकडेला अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. ही डी.पी. पूर्णपणे एका बाजूला कलंडली असून, त्याला ताण देण्याची गरज आहे. वारंवार मागणी करूनही याकडे वीज कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. डीपी पूर्णपणे उघडी असून, या मार्गावरून मोठी रहदारी असते. त्यातून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते.
याबाबत केडगाव उपविभागाच्या अधिकार्यांना समक्ष भेटून परिस्थिती दाखवून देत तसे निवेदनही दिले होते. परंतु अधिकारी व कर्मचार्यांनी याबाबत टोलवाटोलवीच केली असून, यात सुमारे 4 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. डीपीच्या जागेची पाहणी करावी किंवा अधिकार्यांना योग्य त्या सूचना कराव्यात. हे काम 15 दिवसांत मार्गी लागले नाही, तर वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा श्री.सातपुते यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment