Monday, 25 February 2019

नवलेनगरला गजानन महाराज पालखी मिरवणूक


नगर । प्रतिनिधी - सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील नवलेनगरला श्री गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन सोहळा मोठ्या भक्तीपूर्ण वातावरणा साजरा झाला. या सोहळ्यानिमित्त रविवारी हनुमान चालिसाचा भक्तांनी लाभ घेतला.
प्रकटदिनी सकाळी 6 वा. मंदिरात लघुरुद्राभिषेक होऊन सकाळी 9 ते 12 परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी 12 ते 12.30 महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. महाप्रसादानंतर श्रुती संगीत निकेतनचा भजनसंध्येचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांनी दर्शन, महाप्रसाद व कार्यक्रमाचा ंलाभ घेतला. सेवेकरी नवलेनगर रहिवासी सेवा संस्थेच्यावतीने कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment