नगर । प्रतिनिधी - परीक्षा या आपला झालेला अभ्यास तपासण्याचे माध्यम असून, त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. उत्तम ते करावे. शाळेत शिक्षक विद्यार्थ्यांमधील उत्तम गुण हेरुन ते वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात. जीवनात खूप मोठे व्हा... आनंद जगा.. आशिर्वादरुपी पाठीवर हात ठेवणार्या शिक्षकांना, शाळेला व आई-वडिलांना कधीही विसरु नका, असे प्रतिपादन प्रा.मकरंद खेर यांनी केले.
हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयातील इ.10वी च्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी नुकत्याच विद्यालयाच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करतांना प्रा.मकरंद खेर बोलत होते. कार्यक्रमास स्नेहालयाचे हनिफ शेख, पालक खेमसिंह राजपूत, सारडा महाविद्यालयाचे प्रा.रिक्कल आदी उपस्थित होते.
शिक्षक श्री.कसबे यांनी विद्यार्थ्यांना आजची सत्य परिस्थिती विविध उदाहरणांच्या माध्यमातून सांगतांना आपले वागणे, समाजाभिमुख असावे. फॅशनच्या प्रवाहात स्वत:चे अस्तित्व विसरु नये. सौ.वृषाली जोशी यांनी कष्ट, प्रयत्न आणि संधी यांच्या माध्यमातून खूप मोठे होण्याच्या शुभेच्छा देतांनाच तुमची शालेय धावपट्टीवरचे धावणे या परीक्षेनंतर थांबणार असून, आता मोठी भरारी घ्या. उंचीवर स्थिर होईपर्यंत थांबू नका, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मधुकर साबळे यांनी केले. विद्यालयाविषयी स्वयंस्फूर्तीने चि.राजपूत आशुसिंह, कु.शेख आरशीन, नेहा सांकला, प्रतिमा गायकवाड, साक्षी बिट्टे, बिराजदार आनंद, प्रतीक्षा साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे नियोजन दीपक शिरसाठ, सुखदेव नागरे, श्रीमती क्रांती कुंदनकर, विनोद जोशी, लहू घंगाळे, संजय शेकडे, व्ही.एस.कुलकर्णी आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.भालेकर यांनी केले तर आभार शिरसाठ यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने ुपस्थित होते.
No comments:
Post a Comment