नगर । प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यातील सर्व उद्योजकांच्या संघटनांच्या वतीने एकाच दिवशी महावितरणच्या वतीने वाढीव वीजदरवाढीचा निषेध करण्यात आला. त्याअंतर्गत नगरमधील एमआयडीसीतील उद्योजकांच्या आमी संघटनेच्या वतीने या वाढीव वीजदरवाढीचा निषेध करून तसे निवेदन एमआयडीसी विभागाचे महावितरण सहाय्यक अभियंता महाजन यांना देऊन कार्यालयाबाहेर वीजबिलांची होळी करण्यात आली.
यावेळी संघटनेचे संस्थापक अशोक सोनवणे, अध्यक्ष राजेंद्र कटारिया, उपाध्यक्ष संजय बंदिष्टी, सचिव दिलीप अकोलकर, सहसचिव सागर निंबाळकर, जयद्रथ खाकाळ, महेश इंदानी, सुमित लोढा, दौलत शिंदे, मिलिंद कुलकर्णी, सागरराजे निंबाळकर, संजय रिसे, मारुती लेकुरवाळे, भूषण भणगे, एकनाथ खांडरे, राजू राऊत, चाबूकस्वार, थोरे, राजू दरेकर, सोमाणी, गणेश गवळी, पंडित पवार, नागराज बडगिरी, पी. डी. कुलकर्णी आदी उद्योजक उपस्थित होते.
उद्योजकांच्या वीजबिलप्रश्नी राज्य सरकारने वा महावितरणने निर्णायक भूमिका घेणे आवश्यक आहे. वीजबिलप्रश्नी योग्य तोडगा न काढल्यास राज्यभरातील उद्योजकांच्या संघटना एकत्रित येऊन यापुढील काळात बिले भरणार नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले.
No comments:
Post a Comment