Tuesday, 19 February 2019

राजेंद्र उदागे यांचा ‘अर्थवेध’कडून सत्कार


नगर । प्रतिनिधी - सध्या प्रत्येक युवक नोकरीच्या मागे लागला आहे. आज सर्वांनाच नोकर्‍या मिळणे अवघड झाले आहे. परंतु युवकांनी कौशल्य प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावे. त्यासाठी युवकांनी छोट-छोटे कोर्स करुन त्या माध्यमातून स्वत:चा उद्योग सुरु करावा. उद्योगात कष्ट केल्यास तो नक्कीच भरभराटीस येऊ शकतो. तुम्हीही इतरांना काम देऊ शकता, असे प्रतिपादन शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.
उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून राजेंद्र उदागे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा अर्थवेध इन्व्हेसमेंटच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक प्रसाद भडके, डॉ.रमेश वाघमारे, पै.नाना डोंगरे, कवी प्रकाश घोडके, सुनिल गोसावी, भगवान राऊत, राधाकृष्ण जोशी, गिरीष शिंदे, अनिल धोत्रे, राजू पाटकुले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रसाद भडके म्हणाले, आज समाजामध्ये अनेक तरुण आपल्या स्वत:च्या कर्तृत्वाने एखादा उद्योग सुरु करुन प्रगती करत आहेत. राजेंद्र उदागे यांनीही आपल्या कष्टाने उत्तम सेवा देऊन उद्योग क्षेत्रात चांगले नाव कमविले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन उत्कृष्ट युवा उद्योजक पुरस्कार मिळाला आहे. त्यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

No comments:

Post a Comment