Thursday, 28 February 2019

निर्मलनगरमध्ये बंद पाईप ड्रेनेज कामाचा प्रारंभ


नगर । प्रतिनिधी - दैनंदिन जीवनात वीज, रस्ते, पाणी या सुखसुविधा मिळाल्या की बहुतेक प्रश्न आपोआप मार्गी लागतात. नगरची महानगरपालिका होऊनही शहरालगतच्या भागात आजही रस्ते, पाणी, ड्रेनेज प्रश्न सुटलेले नाहीत. प्रभाग क्र.2 मध्ये मात्र निर्मलनगर, लक्ष्मीनगर, सुर्यनगर भागात गेल्या 10 वर्षात निखिल वारे, बाळासाहेब पवार, विनित पाऊलबुधे यांनी नागरिकांचे प्रश्न सोडविले. त्यामुळे या त्रिमूर्तींना पुन्हा-पुन्हा नगरसेवक होण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी एम.बी.साळवे यांनी केले.
निर्मलनगर येथील गाडेकर चौक ते परिसरातील भागात बंद गटार पाईप ड्रेनेज कामाचा शुभारंभ श्री.साळवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगरसेवक विनित पाऊलबुधे, रुपाली वारे, संध्या पवार सुनील त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, ह.भ.प.विश्वनाथ पोकळे, अजय हिवाळे, नितीन काळे, योगेश पिंपळे,  सचिन अकोलकर आदी उपस्थित होते.
निखिल वारे म्हणाले, नागरीकांच्या सेवेत आम्ही चारही नगरसेवक आहोत. तुमच्या प्रश्नांसाठी आम्ही एकत्रीत लढा देऊ. 
तुमच्या पाठबळामुळेच तिसर्‍या वेळेसही नगरसेवकपद वारे यांच्या घरातच आहे. मनपात आमची सत्ता नसली तरी जनतेच्या कामासाठी आम्ही कामे करुन घेतो. यावेळी विनित पाऊलबुधे, बाळसाहेब पवार, सुीनल त्र्यंबके यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाऊसाहेब कासार, मच्छिंद्र तागड, नारायण काते, रमेश ठोंबरे, लहानू तागड, विलास खरात, कैलास तोडकर, वैभव पोकळे, बाळासाहेब हिवाळे,  शोभा वाघमारे, शांता काळे, आश्विनी सोनमाळी, सविता गटणे, लक्ष्मी गारडे, हेमलता सरोदे, नंदा लडकत, सौ.साळवे उषा, सुलोचना पंतम, मानसी सोनमाळी आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment