Thursday, 14 February 2019

वाचनाने माणूस सुसंस्कृत होतो ः इंदुमती जोंधळे


नगर । प्रतिनिधी - चांगल्या वाचनाने, श्रवणाने आणि लेखनाने चांगला माणूस घडतो. वाचनाने माणूस सुसंस्कृत आणि बहुआयामी होतो. मोबाईलच्या जमान्यात वाचन संस्कृती आणि प्रत्यक्ष संवाद हरवत चालला आहे. शिक्षणाने माणसामध्ये आत्मनिर्भरता येते. प्रत्येकाच्या अंगी काहीतरी वैशिष्ट्य असते, प्रत्येकाने एखादा तरी छंद जोपासायला हवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका इंदूमती जोंधळे यांनी केले.
येथील रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी जोंधळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष रा. ह. दरे, सहसचिव अ‍ॅड. विश्वासराव आठरे, ज्येष्ठ विश्वस्त माधवराव मुळे, अ‍ॅड. श्रीमती दीपलक्ष्मी म्हसे, सीताराम खिलारी, संस्था कार्यकारिणीचे सदस्य मुकेश मुळे, जयंत वाघ, अलका जंगले आदी उपस्थित होते. यावेळी जोंधळे यांनी आपल्या बालपणीच्या बोर्डिंगमधल्या आठवणी जागविल्या. भूक लागल्यानंतर खायला काही नसायचे, मग पोटभर पाणी पिऊन आणि भरपूर वाचन करून आपण कशाप्रकारे पाण्याने पोटाची आणि वाचनाने मनाची भूक भागवायचो हे त्यांनी सांगितले. त्यांना जगविणारे दलितमित्र गायकवाड यांच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. सावित्रीबाई फुलेंच्या अंगी असणारी हिंमत प्रत्येक बाईच्या अंगी आली तरच आजची स्त्री सबल बनेल. प्रास्ताविक प्राचार्य ए. आर. दोडके यांनी केले. पाहुण्यांच्या परीचय धनंजय म्हस्के यांनी करुन दिला. अहवाल वाचन प्रा. वैशाली दारकुंडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र देवढे यांनी केले. या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण 80 हजार रुपयांची रोख पारितोषिके वितरीत करण्यात आली. पर्यवेक्षक राजेंद्र लांडे यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक पी. एस. गोरे, पर्यवेक्षक प्रा. दिलीप मगर, एस. एस. मगर, प्रा. आप्पसाहेब पोमणे, प्रा. मोहन कांजवणे, शिक्षक प्रतिनिधी गणेश भापकर, विद्यार्थी प्रतिनिधी संदेश भगत, राजश्री घुंगार्डे, राजेश चौधरी, ऋतू उदार यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment