Tuesday, 19 February 2019

छत्रपतींचे स्मारक प्रेरणादायी ठरेल ः खा. गांधी


नगर । प्रतिनिधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शिवस्मारक उभारण्याचा योग्य निर्णय घेतला आहे. जगातील सर्वात मोठे शिवस्मारक उभारण्यास राज्य सरकारने निधी उपलब्ध करुन भूमिपूजनही केले आहे. अरबी समुद्रात होणारे हे शिवस्मारक हे संपूर्ण जगाचे आकर्षण ठरणार असून, प्रेरणा देणारे असणार आहे. या स्मारकामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा बहुमान होईल. असे अनेक महत्वपूर्ण निर्णय भाजप सरकारने घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व अभिनंदन, असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष खा.दिलीप गांधी यांनी केले. 
शहर भाजपच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरातील त्यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन खा.दिलीप गांधी यांनी अभिवादन केले. सर्व मराठी जनतेचे छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत आहेत, असे सांगून त्यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या विविध कार्यक्रम व उपक्रमांमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण होत असते, असे सांगितले.  यावेळी उपमहापौर मालण ढोणे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, संघटन सरचिटणीस किशोर बोरा, जगन्नाथ निंबाळकर, नितीन शेलार, नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दहिंडे, वसंत राठोड, भरत सुरतवाला, चेतन जग्गी, केदार लाहोटी, प्रकाश सैंदर, नाना भोरे, प्रशांत मुथा, संजय ढोणे, राजू मंगलाराप, अभिजित चिप्पा, मिलिंद भालसिंग, रोशन गांधी, बाबासाहेब भिंगारदिवे, सुरेश काबरा आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment