Tuesday, 26 February 2019

मसाप सावेडी शाखेच्यावतीने रेणावीकर विद्यालयात उद्या ’लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमाचे आयोजन


नगर । प्रतिनिधी - मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद सावेडी उपनगर शाखा व शांतिकुमार फिरोदिया मेमोरियल फौंडेशनच्यावतीने बुधवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेणावीकर माध्यमिक विद्यालयामध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मसाप सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली. 
इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकात समावेश असलेल्या ‘गोधडी’ या कवितेचे कवी डॉ. कैलास दौंड हे लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधणार आहेत. यावेळी डॉ. कैलास दौंड यांच्यासह विविध शाळेतील मराठी विषय शिकविणार्‍या शिक्षकांचाही सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमास रेणावीकर विद्यालयाचे विशेष सहकार्य लाभले आहे.
श्रीमती आशाताई फिरोदिया, सौ.अर्चना कुलकर्णी, लेखक सदानंद भणगे, चंद्रकांत पालवे, भालचंद्र बालटे, सुरेश चव्हाण व रेणाविकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एन. वसावे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार  असल्याची माहिती मसाप सावेडी उपनगर शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलुलकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment