Wednesday, 20 February 2019

श्रीक्षेत्र धरमपुरीत शुक्रवारपासून गजानन विजय ग्रंथाचे पारायण


नगर । प्रतिनिधी - संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त नगर तालुक्यातील इसळक-निंबळक रोडवरील श्रीक्षेत्र धरमपुरीत शुक्रवार, दि. 22 ते 24 फेब्रुवारी यादरम्यान सामूहिक गजानन विजय पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.25 रोजी प्रकट दिन सोहळा होणार आहे.
शुक्रवारपासून दररोज सकाळी 8.30 ते 12 पर्यंत हे पारायण होणार आहे. पुणे येथील गावडेताई व्यासपीठ चालक आहेत. तीन दिवस पारायण होणार आहे. भाविकांनी श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
सोमवार दि. 25 रोजी प्रकट दिनानिमित्त पहाटे 5 ते 7 श्रींचे मंगलस्नान व लघुरुद्र , सकाळी 7 ते 9 अभिषेक आरती, 9 ते 11 गणुवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार, 11 ते 12 श्रींची पालखी मिरवणुक, दुपारी 12 वा. महाआरती दुपारी 12 ते 3 भजन व महाप्रसाद, दुपारी 3 ते 4 ह.भ.प.बाळकृष्ण महाराज खेसे यांचे प्रवचन, संध्या.4 ते 6 वा. ह.भ.प.श्री निवास घुगे यांचे हरिकिर्तन संध्या.6 ते 7 वा. महाआरती व महाप्रसाद होऊन रात्री 10 ते 10.30 शेजारती होईल. या कार्यक्रमांचा भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment