Monday, 18 February 2019

आपल्यातील क्षमता ओळखा ः डॉ. म्हसे


नगर । प्रतिनिधी -  विद्यार्थ्यांनी स्वत:ला ओळखले पाहिजे. आपल्यात असलेली क्षमता व आवड यावर यशाचे शिखर गाठता येते, असे प्रतिपादन डॉ. विक्रम म्हसे यांनी केले.स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने दरेवाडी येथील मळगंगा विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. यावेळी स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे, संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ कर्डिले, उपाध्यक्ष निवृत्ती गवळी, मुख्याध्यापिका हेमलता मगर, प्राचार्य एकनाथ जगताप, बापूसाहेब जगताप आदी उपस्थित होते.डॉ. म्हसे पुढे म्हणाले, योग्य आहार व अभ्यास करण्याच्या योग्य पद्धतीमुळे यश निश्चित मिळते. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व हे चौफेर असावे. यशस्वी करिअरसाठी गुणवत्ता प्राप्त करा.
प्राचार्य जगताप म्हणाले, भविष्यात विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन आपल्या शाळेबरोबरच शिक्षकांनाही विसरू नये.
उध्दव शिंदे म्हणाले, वेळ कुणासाठीही थांबत नसते. त्यासाठी वेळेची किंमत करणे शिका. कारण एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा येत नसते. 
ही बाब लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करून शांततेत पेपर सोडवावा. आदेश नागरे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment