नगर । प्रतिनिधी- जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रंजनकुमार शर्मा यांची नागपुर येथे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनच्या निवासी उपायुक्तपदावर असलेले इशू सिंधू यांची नगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. राज्यातील 10 आयपीस अधिकार्यांच्या बदल्या राज्य गृह विभागाने केल्या. त्यामध्ये सिंधू यांची नगरच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे.
डॉ. रंजनकुमार शर्मा यांनी 1 मे 2017 रोजी नगरच्या पोलीस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यकाळात मोहरम आणि गणेशोत्सव अत्यंत शांततेत पार पडले. तसेच महापालिका निवडणुकीलाही कोणतेही गालबोट लागले नाही. त्यामुळे नगरमध्ये त्यांची चांगली लोकप्रियता झाली होती. केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावर झालेला हल्ला ही दोन्ही प्रकरणे त्यांनी अत्यंत कुशलतेने हाताळली.
इशू सिंधू हे सध्या नवी दिल्ली येथे महाराष्ट्र निवासी उपायुक्त होते.
सिंधू यांनी यापूर्वी औरंगाबाद ग्रामीण पोलिस अधीक्षक, नागपूर पोलिस उपायुक्त, जळगाव अप्पर पोलिस अधीक्षकपदी काम केले आहे. सिंधू यांनी जळगाव येथे अप्पर अधीक्षक असताना माजी मंत्री सुरेश जैन आरोपी असलेल्या घरकुल घोटाळ्याचा तपास केला होता. त्यांनी औरंगाबाद, नागपूर व जळगाव येथे धडाकेबाज कामगिरी केलेली आहे.
No comments:
Post a Comment