Thursday, 28 February 2019

मनपा सभापती निवडणूक 4 मार्चला


नगर । प्रतिनिधी - महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती व महिला बालकल्याण समितीच्या सभापती, उपसभापतीची निवडणूक येत्या 4 मार्चला होणार आहे. विभागीय आयुक्तांनी मनपाच्या प्रस्तावानुसार बुधवारी रात्री ही तारीख जाहीर केली आहे. 
पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता प्रथम स्थायी समिती सभापती व त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती नगरसचिव एस.व्ही.तडवी यांनी दिली आहे. आज गुरूवारी दुपारनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम पीठासीन अधिकार्‍यांकडून जाहीर होणार आहे.

No comments:

Post a Comment