Wednesday, 27 February 2019

साध्वी प्रितीसुधाजी महाराजांची इच्छा पूर्ण करु ः महापौर


नगर । प्रतिनिधी - गुरु महाराजांचा संकल्प प्रेरणादायी आहे. एक अतिशय चांगला असा गो-शाळेचा विचार त्यांनी मांडलाय आणि सध्याच्या वातावरणात शेतकर्‍यांच्या पशुधनाचं संगोपन, संभाळ करण्यासारखे पुण्याचे दुसरे काम नाही. उज्वल गोरक्षण संस्थेच्या या नियोजित गो-शाळेसाठी मनपाचा शहरालगतचा मोकळा भूखंड देण्यासाठी योग्य ती कार्यवाही आणि संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी जैन समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.  वाकोडी येथील कत्तलखान्याच्या प्रश्नाबाबतही जैन समाजाचा असलेला विरोध आणि गुरु महाराजांच्या भावनांचा विचार करुन आपण योग्य तोच निर्णय घेऊ अर्थात हा कत्तलखाना होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष मुथा यांच्या नेतृत्वाखाली जैन समाजातील कार्यकर्त्यांनी महापौर श्री.वाकळे आणि उपमहापौर मालनताई ढोणे यांची भेट घेऊन गो-शाळेसाठी भुखंडासह सहकार्याची विनंती केली. 
सुभाष मुथा म्हणाले, अहिंसा-जीवदया हा जैन समाजाचा आत्मा आहे. जैन धर्मात जीवदयेला सर्वोच्च प्राधान्य असून, वाढती हिंसा सध्याच्या शेतकर्‍यांची बिकट परिस्थितीत त्यांच पशुधन कत्तलखान्याकडे जातय.  किरणप्रभाजी महाराजांनीही नगरला गो-शाळा प्रकल्पाची गरज बोलून दाखवली होती, असे श्री.  मुथा यांनी सांगितले.
 शिष्टमंडळात जैन मंदिराचे विश्वस्त राजू शहा, किशोर भंडारी, दिनेश गांधी, व्यापारी कार्यकर्ते फुलचंद गांधी, शैलेश गांधी, शेखर गांधी, संतोष गांधी, राजेंद्र गांधी, सचिन चोपडा, विनोद कटारिया, अशोक बलदोटा, शांतीलाल गुगळे आणि अजय बोरा आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment