नगर । प्रतिनिधी- आयकर विभागाच्या पथकाने शहरात एकाचवेळी सात ठिकाणी छापे टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. शनिवार व रविवारच्या तपासणीनंतर आज (दि. 18) ही कारवाई मोहिम थांबली. सुमारे 40 तास ही कारवाई सुरू होती. यात आयकर विभागाने कागदपत्रांसह बँक खात्यांची कसून चौकशी करुन महत्त्वाचे कागदपत्र ताब्यात घेतले आहेत.
शहरात सात ठिकाणी एकाचवेळी आयकर विभागाच्या नगर व पुणे येथील पथकांनी छापे टाकले. प्रोफेसर कॉलनी चौकातील एका भव्य कॉम्प्लेक्समध्ये कार्यालय असलेला उद्योजक तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी शाखांचे जाळे असलेल्या एका मल्टीस्टेट पतसंस्थेचा पदाधिकारी यासह शहरातील काही बिल्डर्स यांच्या कार्यालयावर व निवासस्थानांवर छाप्याची कारवाई झाली आहे.
ही नियमित कारवाई आहे. कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. अद्यापपर्यंत काहीही आक्षेपार्य आढळले नाही. तपासणी सुरू असल्याने सध्या काहीही सांगता येणार नाही. कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक वाटल्यास तपशील जाहीर करू, अशी प्रतिक्रिया आयकर विभागातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
No comments:
Post a Comment