नगर । प्रतिनिधी - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील उपजिल्हाधिकारी दर्जाच्या दहा अधिकार्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. त्याच प्रमाणे 15 तहसीलदारांच्याही बदल्या झाल्या आहेत. त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी जिल्ह्याबाहेरुन बदलून आले आहेत.
उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, संदीप आहेर, भागवत डोईफोडे, ज्योती कावरे, गोविंद दाणेज, नीलेश जाधव, जयश्री माळी, वामन कदम, रवींद्र ठाकरे, धनंजय कदम यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या आहेत. तर त्यांच्या जागी उदय किसवे, पंकज चौबळ, शशिकांत मंगरुळे, महेश पाटील, संजय बागडे, राहुल मुंडके, जितेंद्र वाघ, गोविंद शिंदे हे जिल्ह्याबाहेरुन बदलून आले आहेत. तसेच जिल्ह्यातील 15 तहसीलदारांच्याही बदल्या झाल्या असून त्यांच्याजागी बाहेरील जिल्ह्यातून तहसीलदार आले आहेत. नगर तालुक्याचे तहसीलदार अप्पासाहेब शिंदे यांची नाशिकला बदली होऊन त्याठिकाणी निवडणूक शाखेचे उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment