नगर । प्रतिनिधी - आशिष राऊत हा सारडा महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो.सारडा महाविद्यालयाचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचे कार्य आशिष राऊतने केले आहे. कला, क्रीडा, सांस्कृतिक, संगीत, नाट्य, साहित्य, विज्ञान सर्वच क्षेत्रात सारडा महाविद्यालयाचे विद्यार्थी आघाडीवर आहेत.जपान येथे होणार्या प्रदर्शनात राऊत भारताचे प्रतिनिधित्व करेल.आशिष राऊत या विद्यार्थ्याचा सन्मान राष्ट्र्पतीच्या हस्ते होणार ही महाविद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे, असे प्रतिपादन जुनिअर कॉलेजचे चेअरमन अॅड.अनंत फडणीस यांनी केले.
भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभाग व नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 7व्या राष्ट्रीय पातळीवर “इन्स्पायर अवॉर्ड मानक” या प्रदर्शनात सारडा महाविद्यालयातील 11वी सायन्स शाखेचा विद्यार्थी आशिष राऊत याने सादर केलेल्या फोल्डिंग टॉयलेट या आगळ्यावेगळ्या उपकरणास महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळाला व दिल्लीचा “इन्स्पायर अवॉर्ड” मिळाल्याबद्दल आशिष राऊतचा सारडा महाविद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी हिंदसेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरीष मोडक,कार्याध्यक्ष व वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन ब्रिजलाल सारडा, माजी मानद सचिव सुनील रामदासी,जुनिअर कॉलेजचे चेअरमन अॅड.अनंत फडणीस, उपकार्याध्यक्ष अजित बोरा, डॉ.पारस कोठारी, अनंत देसाई, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र शिंदे, रजिस्ट्रार अशोक असेरी,पर्यवेक्षिका डॉ.मंगला भोसले, प्रा.संजय साठे, प्रा.संजय धोपावकर, प्रा.प्रसाद बेडेकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.शिरीष मोडक म्हणाले की,सारडा महाविद्यालयात अनेक विद्यार्थी घडले आहेत.उज्वल यशाची परंपरा आशिष राऊतने राखली आहे. ब्रिजलाल सारडा म्हणाले की,राऊतने दिल्लीचा मानाचा “इन्स्पायर अवॉर्ड” मिळवून सारडा महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सुनील रामदासी म्हणाले की, आशिष राऊत या विद्यार्थ्यांचाआदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यावा. प्राचार्या डॉ.अमरजा रेखी यांनी आशिष राऊतचे विशेष कौतुक केले. सूत्रसंचालन प्रा.प्रसाद बेडेकर यांनी केले तर आभार प्रा.संजय साठे यांनी मानले.
No comments:
Post a Comment