नगर । प्रतिनिधी - याव्हे शाम्मा संस्था संपूर्ण महाराष्ट्रात धार्मिक, सामाजिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्यरत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये सेवाभाव जागृत करणे, प्रेम, करूणेचा संदेश देणे यासाठी संस्था विशेष प्रयत्न करीत आहे. राज्यात अनेक समाजबांधव निःस्वार्थी वृत्तीने लोकांची सेवा करण्याचे काम करतात. अशा कर्तृत्ववान लोकांचे कार्य सर्वांसमोर यावे, यासाठी याव्हे शम्मा संस्था 30 वर्षांपासून प्रयत्न करीत आहे, असे प्रतिपादनयाव्हे शाम्मा संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार गायकवाड यांनी केले.
याव्हे शाम्माच्यावतीने विविध क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने कार्य करणार्या राज्यातील 30 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रावसाहेब पटवर्धन स्मारकात झालेल्या या कार्यक्रमात नगरच्या जिल्हा रूग्णालयात शासकीय वाहनचालक म्हणून सेवा देणारे अनिल (राजू) प्रसादराव गोर्डे यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमास अॅड. योहान मकासरे, डॉ. विल्सन वाघमारे, पी. जी. घोडके, दिवाकर खरात, सुधीर गायकवाड, प्रतिभा गायकवाड, अभिजित गायकवाड, शालिनी गोर्डे, नंदा गोर्डे, मनीषा गोर्डे, नेहा गोर्डे, सोनाली गोर्डे, सतीश आहिरे, किशोर कुडिया आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment