नगर । प्रतिनिधी - बंगलोर (कर्नाटक) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत अ.ए.सो.चे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी राहुल सुनील थोरात (इ.9 वी) याला सुवर्णपदक मिळाले आहे.
त्याच्या या यशाबद्दल अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी परसंस्थेचे चेअरमन शेखर देशपांडे व व्हा.चेअरमन बाळासाहेब गंगेकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक दिलीप कोतकर, बाबासाहेब मुदगल, प्रकाश अजबे,बाळासाहेब पवार, विकास गिते, अजय कांबळे, किशोर कानडे, सतिश ताठे, संस्थेचे जेष्ठ माजी संचालक वसंत थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर देशपांडे म्हणाले, खो खो हा आपला महाराष्ट्राचा खेळ आहे. या खेळात नगर जिल्ह्याने या पूर्वीही भरीव अशी कामगिरी केलेली आहे. खो खो खेळातील प्राविण्यामुळे शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारे खेळाडू नगर शहरातील आहेत.
राहुल थोरात याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून नगर शहराचा लौकिक पुन्हा एकदा वाढविला असल्याचे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment