नगर । प्रतिनिधी - स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता जवान आपल्या व देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर चोवीस तास कार्यरत आहेत. त्यांच्या त्यागामुळेच आपण देशात सुरक्षीत आहोत. दहशतवाद्यांनी जवानांवर केलेला भ्याड हल्ला अत्यंत निंदणीय असून भारत सरकारने दहशतवादी प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे आवाहन इंड्स वर्ल्ड स्कूलचे संचालक विनायक देशमुख यांनी केले.
येथील इंड्स वर्ल्ड स्कूलमध्ये आज (शुक्रवार) सकाळी शहीद श्रध्दांजली सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
देशमुख पुढे म्हणाले, पुलवामा येथे काल सीआरपीएफ जवानांवर झालेला दशतवादी हल्ला हा केवळ जवानांवरचा नसून देशातील प्रत्येक भारतीयावर झालेला आहे. देशाने आपले चाळीस कुटुंबीय गमावले आहेत.
या दु:खद प्रसंगी संपूर्ण देशवाशीय शहिदांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत, अशा शब्दात शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.
याप्रसंगी उपप्राचार्या कविता सुरतवाला यांनी कालच्या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. त्यानंतर रश्मी झा, विद्यार्थिनी खुशबू बजाज व साक्षी जाधव यांनी श्रध्दांजलीपर भाषणे केली. याप्रसंगी ये मेरे वतन के लोगो या गाण्याची धून वाजविण्यात आली. तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी यांनी दोन मिनिटे स्तब्धता पाळून शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.
No comments:
Post a Comment