Wednesday, 20 February 2019

हायजिन फर्स्टमुळे नगरची वेगळी ओळख होईल


नगर । प्रतिनिधी - दररोज नैसर्गिक पदार्थ खाल्ले तर चांगले पचन होऊन शरीर ते बाहेर काढते. मात्र आपण सध्या मोठ्या प्रमाणात अनैसर्गिक केमिकलयुक्त पदार्थ खात असल्याने पोटात केमिकल साठत आहे. त्यामुळेच सर्वांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी आपल्या अन्नाबाबत आपणच जागरुक असावे. हेच काम हायजिन फर्स्टमार्फत होत आहे. शहरात सर्वत्र हायजिनची अंमलबजावणी होण्यासाठी चांगले टिमवर्क करुन उत्कृष्ट काम होत आहे. त्यातून नगरची नवी वेगळी ओळख निर्माण होईल, असे प्रतिपादन न्यू आर्टस् महाविद्यालयाचे प्राचार्य बी.एच.झावरे यांनी केले.
आपण खात असलेल्या अन्नाबाबत प्रत्येकाच्या मनात जागृकता निर्माण व्हावी, यासाठी नगर शहरामध्ये हायजिन फर्स्टच्या माध्यमातून चळवळ उभी राहिली आहे. हायजिन फर्स्टच्या संस्थापिका वैशाली गांधी यांच्या संकल्पनेतून हायजिनबाबत नगरमध्ये अधिक जागृती व्हावी यासाठी  हायजिन संकल्प जनजागृती स्पर्धा माहितीपट, लघुपट व पथनाट्य अशा अनोख्या स्पर्धेचे आयोजन नगर शहरात करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक युवक-युवतींनी व ग्रुपने आपआपल्या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेतून मोबाईलद्वारे हायजिन जनजागृतीचे व्हिडिओ बनविले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्राचार्य झावरे, सोल सिस्टरच्या संस्थापिका रिंकू फिरोदिया यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी  वैशाली मुनोत, रॉबिनहूड आर्मीचे रुपेश नायर, शंतनू संत आदी उपस्थित होते.
सौ.रिंकू फिरोदिया म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून चालू असलेल्या हायजिन फर्स्टच्या कार्याने मी प्रभावित झाले आहे. म्हणून मी या नि:स्वार्थी व जनजागृती कार्यासोबत शांतीकुमार फौंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे. 
प्रास्ताविक गिरिष कुकरेजा यांनी केले. सूत्रसंचालन स्वच्छतादूत आश्लेषा भांडरकर यांनी केले. यावेळी हायजिन फर्स्टच्या सदस्या गायत्री रेणावीकर, सुरभी सावज, रुपाली बिहाणी, वैशाली झंवर, मनीष बोरा, मयुर राहिंज, दीपाली चुत्तर, नवीन दळवी, अनुराधा रेखी, कांचन शर्मा, अविनाश भांडरकर, निर्मल गांधी आदींसह मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होेते.

No comments:

Post a Comment