नगर । प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या शाळांना अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांना पौष्टिक खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक मेघराज बजाज यांनी नवलेवस्ती येथील जि.प. प्राथमिक विद्यालयास सरप्राईज भेट देऊन मुलांना बिस्किटांचे डबे वाटले. या सरप्राईज भेटीने विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे, सहशिक्षक ज्ञानदेव शिंदे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनायक नवले, विरेन शिंदे, कल्याण नवले, कविता बजाज आदी उपस्थित होते. बजाज शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देत असून त्यांनी अनेक शाळांमध्ये लाखो रुपयाचे शैक्षणिक साहित्य व मुलांना पौष्टिक खाद्य पदार्थाचे वाटप केले आहे. करी मनोरंजन मुलांचे.., जडले नाते प्रभू तयाचे या उक्तीचा प्रत्यय नवलेवस्ती जि.प. प्राथमिक शाळेत या उपक्रमातून आला. सर्वसामान्य परिस्थितीतून आलेले बजाज आपल्या विद्यार्थी दशेतील शालेय जीवनांना उजाळा दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले. शाळेशी असलेली नाळ तुटू शकत नाही व शाळेचे ऋण न फेडता येणारे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
अनिता काळे यांनी मंदिरापेक्षा शैक्षणिक मंदिरांना मदत करणार्या हातांची गरज आहे. शैक्षणिक मंदिरातूनच भारताचे उज्वल भवितव्य घडणार असून, बजाज यांच्यासारखे व्यक्तीमत्व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. मेघराज बजाज यांचा शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती भेट देऊन त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment