नगर । प्रतिनिधी - स्री ही तिच्या कुटुंबाची खरी आधारस्तंभ असते, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी ती नेहमीच धडपडत असते. अशा सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना सप्तशृंगी महिला गृहोद्योगामुळे मोठा आधार मिळाला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेला हा गृह उद्योग महिलांसाठी महत्वाचा ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शहरातील तोफखाना परिसरात महिला बचत गटांच्या माध्यमातून सप्तशृंगी महिला गृहउद्योग सुरु करण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन आ.जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमास सप्तशृंगी महिला गृह उद्योगच्या संचालिका जयश्री सूळ, माजी उपमहापौर दीपक सूळ, नगरसेवक संपत बारस्कर, कुमार वाकळे, सारंग पंधाडे, दिलदारसिंग बीर, सुरज जाधव, मयूर जोशी, अमोल भंडारे, मंगेश धिरडे, अभिनंदन ढोरे, अक्षय डाके, कैलास गोंधळे, बंटी बागडे, जय म्याना, दीपाली गारदे, स्वाती सूळ, मनीषा सूळ, नीता बिद्रे, नंदा शेळके, ज्योती बिद्रे, उज्ज्वला वाघमारे, नंदा काटकर, सुनिता राऊत, विद्या बिद्रे, नीलम ढोरे आदी उपस्थित होते.
आ. जगताप पुढे म्हणाले, शहरातील तोफखाना परिसर हा कष्टकरी नागरिकांचा परिसर आहे. या भागात विडी कामगारांची संख्या मोठी आहे, मात्र दिवसेंदिवस हा व्यवसाय लोप पावत चालला आहे. त्यामुळे या कष्टकरी जनतेला मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या परिस्थितीत सप्तशृंगी महिला गृहोद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. कापसापासून फुलवाती बनविण्याचा उद्योग सुरु केला असून या पुढील काळात या उद्योग व्यवसायाचा नक्कीच विस्तार होईल असा आशावाद आ.जगताप यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment