Tuesday, 19 February 2019

‘इंटरनेट ऑफ थिंगज्’ कार्यशाळेस प्रतिसाद


नगर । प्रतिनिधी - डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभाग व इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअर्स अहमदनगर लोकल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनेट ऑफ थिंगज्’ या विषयावर चार दिवसांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
डिजीटल डोजो प्रा. लिमिटेड (मुंबई) येथील सचिन सदरे व राजा चौधरी यांनी या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सध्याच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ‘इंटरनेट ऑफ थिंगज्’ हे तंत्रज्ञान आपल्या जीवनातील अत्यावश्यक भाग बनत आहे. विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील 90 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला. आय.ओ.टीचा वापर करुन विविध नवनवीन संकल्पनामधील काही नावीन्यपूर्ण प्रोजेक्ट तयार करण्यात आले.  यामध्ये ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीम, ऑनलाईन वोटिंग सिस्टीम, ऑटोमॅटिक साईन बोर्ड, ऑटोमॅटिक रुम टेंपरेचर, वेदर मॉनीटरींग अशा प्रकारचे प्रोजेक्टस् विद्यार्थ्यांनी तयार केले. हे प्रोजेक्टस् शेतीसाठी, आरोग्य पध्दतीसाठी, महिलांच्या सुरक्षासाठी उपयुक्त ठरणारे आहेत.
या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. वि.वि.पाटील फौंडेशनचे उपसंचालक सुनील कल्हापुरे व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक यांच्या हस्ते झाले.
 विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळाल्याने यात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. दीपक विधाते यांच्या मार्गदशनाखाली कार्यशाळा समन्वयक प्रा. कु. मोनिका गुंजाळ यांनी परिश्रम घेवून या कार्यशाळेचे यशस्वीरित्या आयोजन केले.
कार्यशाळेसाठी प्रा. सौ. आरती बावणे, सौ. हर्षदा पटेकर, सौ.प्रतिभा गायके व मीना दरंदले यांनी विशेष योगदान दिले.

No comments:

Post a Comment