Tuesday, 26 February 2019

शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांकडून ‘मोदी...मोदी...’ चा जयघोष


नगर । प्रतिनिधी - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांमुळे व घेतलेल्या महत्वाच्या निर्णयामुळे  भारताची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली आहे. या आधीच्या पंतप्रधांनापेक्षा अधिक बहुमान भारताचे पंतप्रधान म्हणून मोदी सर्वत्र मिळवत आहेत. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्व व धाडसी स्वभावामुळे संपूर्ण जगात नरेंद्र मोदींचे चाहते आहेत. ‘मन की बात’ च्या माध्यमातून त्यांनी सर्वात मोठे संपर्क अभियान राबवले आहे. बुथप्रमुखांना या माध्यमाद्वारे आज केलेले मार्गदर्शन फार मोलाचे होते, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांनी केले.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ‘मन की बात’ या आपल्या अनोख्या संपर्क अभियानाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधला. तसेच देशातील भाजपाच्या बूथ प्रमुखांना आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुमोल मार्गदर्शन करून संबोधित केले. या जाहीर कार्यक्रमाचे दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. नगरमध्ये शहर भाजपच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोदींची ‘मन की बात’ ऐकण्यासाठी  खा.दिलीप गांधी यांच्या संपर्क कार्यालयात मोठा स्क्रीन लावून व स्पीकरची व्यवस्था करण्यात आली  होती. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. मोदींच्या प्रभावी भाषणामुळे उपस्थित सर्वजण सतत टाळ्या वाजवून व मोदी... मोदी..., भारतमाता की जय... अशा घोषणा देऊन त्यांच्या भाषणास दाद देत होते. भाषण संपल्यानंतर सर्वांनी उभे राहून टाळ्या वाजून मोदींच्या या प्रभावी भाषणाची वाहवा केली. त्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रामदासी यांनी छोटेखानी भाषणात या सभेचे कौतुक केले.
यावेळी उपमहापौर मालन ढोणे, उपाध्यक्ष श्रीकांत साठे, सरचिटणीस किशोर बोरा, सुवेंद्र गांधी, नगरसेवक मनोज कोतकर, स्वप्नील शिंदे, अजय चितळे, प्रशांत मुथा, गणेश ननावरे, चेतन जग्गी, किशोर वाकळे, विश्वनाथ पोंदे, वसंत राठौड, कालिंदी केसकर, शिवाजी दहिहंडे, संतोष शिरसाठ, नरेश चव्हाण, शुभांगी साठे, दिगंबर ढवण, दामोदर माखीजा, सुनील तावरे, नाना भोरे, अमित गटणे, चंदन बारट्टक्के, उमेश साठे, अभिजित चिप्पा, प्रकाश सैदर, रोषण गांधी, ज्ञानेश्वर जंगम, महेश सब्बन, चंद्रकांत रेणावीकर, गोपाल वर्मा आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment