नगर । प्रतिनिधी - इंडस वर्ल्ड स्कूलच्या माध्यमातून वर्षभर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. अशा उपक्रमामुळे विद्यार्थांचा सर्वांगीण विकास होतो, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षीत यादव यांनी केले.
इंडस वर्ल्ड स्कूलच्या इंडोत्सव 2019 चे उद्घाटन यादव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे संचालक विनायक देशमुख, प्रभारी प्राचार्य कविता सुरतवाला, विविध विषयांच्या शिक्षकांबरोबरच क्रीडाशिक्षक व पालक उपस्थीत होते. प्रारंभी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
गतवर्षी दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी रोहन साळुंके व अमित चव्हाण, मुलींमध्ये प्रथम आलेल्या ज्ञानदा मानेराव यांना स्व. सुधाकर देशमुख, स्व. भाऊसाहेब कर्डिले, स्व. रामचंद्र धस यांच्या स्मरणार्थ व प्रथम प्राचार्य प्रगती कपूर यांच्या वतीने रोख पारितोषिके देण्यात आली. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पुरस्कार आदित्य मिरगणे यास देण्यात आला. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या यशश्री शेळके, मंदार म्हस्के, वरूण शेटे, ध्रुव वाघ, आदेश शेवाळे, अब्दुल शेख, ओम स्वामी, सार्थक गोरे, तेजस्विनी मिरगणे यांचा विषेश सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी ध्रुव वाघ, श्रद्धा ठाकूर, ब्युटी सिंग, समृध्दी गांधी यांनी केले.
No comments:
Post a Comment