Saturday, 23 February 2019

मुलांच्या यशाचे कौतुक केल्यास त्यांचे मनोबल वाढते ः श्रीनिवास बोज्जा


नगर । प्रतिनिधी - आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांचा कस लागत आहे. आज एवढी स्पर्धा वाढली आहे की, एक-एक गुणांना महत्व आले आहे. अशावेळी मुलांनी मिळविलेले यश हे कौतुकास्पद असेच असते. चि.संकेत याने सीए परीक्षेत तर राज जाधव, शिवराज कार्ले यांनी कुस्तीत मिळविलेले यश नगरकरांच्यादृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांना प्रोत्साहन देऊन पुढील यशासाठी त्यांचे मनोबल वाढविले पाहिजे, यासाठी आम्ही संघटनेच्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार करत असतो, असे प्रतिपादन फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले. 
अहमदनगर फटाका असो.च्यावतीने सीए परिक्षेत यश मिळविल्याबद्दल संकेत पोखरणा व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत राज जाधव, शिवराज कार्ले यांनी यश मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सेक्रेटरी सुरेश जाधव, उपाध्यक्ष शशिकांत गायकवाड, कैलास खरपुडे, सहसेक्रेटरी अनिल टकले, कार्याध्यक्ष गजेंद्र राशिनकर, सदस्य अरविंद साठे, उमेश क्षीरसागर, राजेंद्र छल्लाणी, संजय जंजाळे, विकास पटवेकर, संतोष तोडकर, गणेश परभणे, अमोल तोडकर, सागर हरबा, शिवराम भगत, अतुल आंबेकर, छबूनाना जाधव, जयप्रकाश बोगावत, निखिल परभणे, संतोष बोरा, शिरीष चंगेडे आदी उपस्थित होेते.
संकेत पोखरणा हे फटाका असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष कै.संजय पोखरणा यांचे चिरंजीव आहेत तर राज जाधव हे संघटनेचे सेक्रेटरी सुरेश जाधव यांचे पुतणे आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संघटनेच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश क्षीरसागर यांनी केले तर आभार सुरेश खरपुडे यांनी मानले. यावेळी पुलवामा येथे शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a Comment