Monday, 25 February 2019

धरमपुरीत भाविकांची मांदियाळी


नगर । प्रतिनिधी -  तालुक्यातील निंबळक येथील श्रीक्षेत्र धरमपुरी येथे श्री संत गजानन महाराज प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी पालखी मिरवणुकीने मंदिर प्रदक्षणा घालण्यात आली. महाआरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भाविकांची  मोठी गर्दी झाली होती.
श्रीक्षेत्र धरमपुरी येथे शेगांवप्रमाणेच 1999 साली श्री संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली असून, गेल्या 19 वर्षांपासून प्रकट दिन व धार्मिक उत्सव साजरे होतात. प्रति शेगांव म्हणून श्रीक्षेत्र धरमपुरी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी प्रकट दिनाला जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येथे येतात.
श्रीक्षेत्र धरमपुरी संस्थानच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद व दर्शनाची चांगली व्यवस्था केल्याने हजारो भाविकांनी भक्तीमय वातावरणात प्रकट दिनाचा आनंद घेतला.

No comments:

Post a Comment