नगर । प्रतिनिधी - जिल्हा पोलीसप्रमुख म्हणून काम करताना रंजनकुमार शर्मा यांनी आपल्या कार्यकुशलतेने अनेक प्रकरणे हाताळली. त्यांनी आपल्या कामातून वेगळा ठसा निर्माण केला आहे. त्यांची वरिष्ठ पोलीस अधीक्षक पदावर झालेली बढती नगरकरांसाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन केडगाव फटाका असोसिएशनचे अध्यक्ष रमेश परतानी यांनी केले. एसपी शर्मा यांना वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एस.एस.पी.) पदावर बढती मिळाल्याबद्दल त्यांचा केडगाव फटाका असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी असो.चे अध्यक्ष रमेश परतानी, उपाध्यक्ष राजेशभैय्या सातपुते, खजिनदार संतोष फसले, सेक्रेटरी राजेंद्र सातपुते, एकनाथ कोतकर, किरण ठुबे, शेख हुसेन मंडपवाले, गोरख गारुडकर, शेख सलीम, किरण गुंड, संतोष गुंड, भाऊ घुले, जाकीर मनियार, शुभम रासकर, भैय्या मतकर, गौरव कार्ले आदी उपस्थित होते. एसपी शर्मा यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करून नगरकरांच्या सहकार्यामुळेच चांगले काम करू शकलो, असे सांगितले.
उपाध्यक्ष राजेशा सातपुते म्हणाले की, केडगाव फटाका असोसिएशनची मागील वर्षी स्थापना करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा प्रयत्न आहे. सामाजिक सलोखा कायम राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या कामी पोलिसांचे चांगले सहकार्य मिळत आहे.
No comments:
Post a Comment