नगर । प्रतिनिधी - पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या ताफ्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घ्या, पाकिस्तानवर हल्ला करून दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्या, अशी मागणी शहरातील नालेगाव येथील सुमारे एक हजार नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून केली आहे.
नालेगावातील नागरिकांनी गुरुवारी (दि. 14) सिद्धीबागेजवळील हुतात्मा स्मारक येथे जावून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी नगरसेविका सोनाली चितळे, अजय चितळे, तुषार चितळे, सायली चितळे, अविनाश परळकर, सचिन खताडे, युवराज पडोळे, गणेश म्याना, दशरथ चोपडे, अरुण लांडे, अजय राऊत, शंकर आरोळे, अनिल वाघ, प्रशांत चितळे, दत्ता वामन, वैभव गिते आदी उपस्थित होते. त्यानंतर शुक्रवारी (दि. 15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नालेगावातील नागरिकांनी पत्र पाठविले. यावर सुमारे एक हजार नागरिकांच्या सह्या आहेत. यात म्हटले आहे की, भारतीय सैन्य दलाने काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला धडा शिकवला आहे. मात्र तरीही पाकिस्तान भारतामधील अतिरेकी कारवाया थांबवत नाही. आता अंतिम चोख प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. इर्ंट का जबाब पत्थरने देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment