नगर । प्रतिनिधी - श्रृती संगीत निकेतनचे 7 विद्यार्थी संगीताच्या विविध परीक्षांमध्ये केंद्रात प्रथम आले आहेत. श्रद्धा देशपांडे, अनुजा कुलकर्णी, गिरीजा चांदेकर यांनी संगीत विशारद ही पदवी प्राप्त केली.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या वतीने नोव्हेंबर 2018 मध्ये घेण्यात आलेल्या विविध संगीत परीक्षांमध्ये श्रृती संगीत निकेतनच्या 7 विद्यार्थ्यांनी नगर केंद्र क्र. 99 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. संगीत परीक्षांमध्ये यश मिळवण्याची निकेतनची परंपरा या वर्षीही विद्यार्थ्यांनी कायम राखली.
श्रद्धा देशपांडे, अनुजा कुलकर्णी व गिरीजा चांदेकर या विद्यार्थ्यांना संगीत विशारद ही पदवी प्राप्त झाली आहे. शिल्पा मुळगुंद, गुंजन गोले, प्रेरणा खामकर, विवेक सरोदे, डॉ. गौरी जोशी, प्रचीती खिस्ती व श्रद्धा देशपांडे हे विद्यार्थी केंद्रात प्रथम आले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना डॉ. धनश्री खरवंडीकर, मकरंद खरवंडीकर, प्रसाद सुवर्णपाठकी व प्रचिती खिस्ती यांचे मार्गदर्शन मिळाले.
विद्यार्थ्यांचा परीक्षानिहाय - प्रारंभिक परीक्षा गार्गी देशपांडे, दीपाली कापरे, अदिती रेखे, उमा रेखे, शिल्पा मुळगुंद, आदित्य झाडे, राजश्री झाडे, आदर्श लाटे, भक्तीप्रिया जोशी, गार्गी कामतकर, प्रज्ञा कुंटला, शुभांगी फुलारी, श्रेया देशपांडे, शौनक कुलकर्णी (तबला), प्रवेशिका प्रथम परीक्षा - अस्मिता ढगे, गुंजन गोले, समृद्धी वाघ, शिवानी येमूल, किर्ती जपे, अस्मिता भोगाडे, तेजस्विनी मालुंजकर, भार्गव बडवे (हार्मोनिअम), वैष्णवी मोरे, ज्ञानेश्वर गुंड (हार्मोनिअम), शुभ्रा कोठुळे, सुपर्ण प्रताप, वैभवी सुपेकर, सुजाता जाधव, अलका तांबे, प्रवेशिका पूर्ण परीक्षा - प्रेरणा खामकर, विवेक सरोदे, शर्वानी सोनसळे, अनुष्का क्षीरसागर, श्रृतविंदा चानसीकर, संस्कृती कुलकर्णी, भक्ती दीक्षित, मनस्वी लगड, अलका पेंडसे (हार्मोनिअम), सर्वज्ञा कराळे, सानिका नगरकर, कीर्ती क्षीरसागर, मध्यमा प्रथम परीक्षा - गौरी जोशी, प्रतीक्षा काळे, सिद्धी पावसे, मध्यमा पूर्ण परीक्षा - प्रचिती खिस्ती, शांतनू भूकन, विशारद प्रथम परीक्षा - अक्षता भंडारी, उमा देशपांडे, विशारद पूर्ण परीक्षा - श्रद्धा देशपांडे, अनुजा कुलकर्णी, गिरीजा चांदेकर, अलंकार प्रथम - माधवी ऋषी यांनी यश मिळविले.
No comments:
Post a Comment